घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभरधाव दुचाकीची पाण्याच्या टाकीला धडक; चालक ठार, एक जखमी

भरधाव दुचाकीची पाण्याच्या टाकीला धडक; चालक ठार, एक जखमी

Subscribe

सांगवी शिवारातील घटना

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात वडांगळी-उजणी रस्त्यालगत जमिनीला समांतर असलेल्या पाण्याच्या टाकीला भरधाव दुचाकी धडकल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना रविवारी (दि.27) पहाटे घडली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुधाकर आवारे (वय 34, रा. वाकद शिरवाडे, ता. निफाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील दौलत वाणी (वय 38, रा. चिंचोळे शिवार, अंबड, नाशिक) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, वडांगळी-उजनी रस्त्यालगत सांगवी शिवारात शेतात असलेल्या सिमेंटच्या टाकीला भरधाव दुचाकी (एमएच 15 जिपी 018) धडकलेल्या अवस्थेत सकाळी रस्त्यावरून जाणार्‍या शेतकर्‍यांच्या निदर्शनास आली. दुचाकीजवळ अनोळखी दोन युवक पडले असल्याचे आढळले. पहाटेच्यावेळी रस्त्याने जात असताना दुचाकीचा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. दुचाकीचालक तरुण जागेवरच ठार झाला होता तर दुसरा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला होता. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पांगरी येथील रुग्णवाहिकेतून दोघा तरुणांना सिन्नरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत निलेश आवारे यास मृत घोषित केले. तर सुनील वाणी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात आणल्यावर ओळखपत्रावरून दोघांची ओळख पटली. त्यांच्या मोबाईलवर येणार्‍या कॉलवर दोघांच्याही घरच्यांना अपघाताची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस शिपाई सागर गिते करीत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -