डंपरखाली चिरडून दोन तरुण ठार; एक जखमी

नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी पंपीग खर्जुल मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शुक्रवारी (दि.१४) ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीनजण डंपरखाली आले असून दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आदर्श रोहिदास कराड (१७) आकाश गवळी ( २२) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर बाळू केदारे (२४) असे जखमीचे आहे.

चेहेडी पंपीग खर्जुल मळ्याकडे जाणार्‍यागजानन पार्क अपार्टमेंटसमोरुन डंपर जात असताना भरधाव दुचाकी डंपरखाली आली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर ज्ञानेश्वर केदारे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बिटको रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरज बिजली, वाहतूक निरिक्षक के. डी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.