घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचुंचाळे घरकूल भागातही दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम; भाजप, स्वराज्य आक्रमक

चुंचाळे घरकूल भागातही दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम; भाजप, स्वराज्य आक्रमक

Subscribe

नाशिक : चुंचाळे घरकुल परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य संघटना व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या वतीने अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना देण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजली यांनी दिली.

राज्यभर अनधिकृत दर्गा आणि त्यासभोवतीच्या अतिक्रमित बांधकामांचा मुद्दा चर्चेचा ठरला असतानाच नाशिकमध्येही गेल्या आठवड्यात नवश्या गणपती मंदिरालगत असलेल्या अशाच एका स्थळाचा मुद्दा पुढे आला होता. त्यापाठोपाठ आता चुंचाळे येथील दर्ग्याच्या बांधकामाचा प्रश्न चर्चेत आला आहे. चुंचाळे घरकुल परिसरात रात्रीच्या वेळी दर्ग्याचे बांधकाम केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चुंचाळे घरकुल परिसरात कोणताही दर्गा नाही. या ठिकाणी दर्ग्याचे बांधकाम करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. दर्ग्याचे अतिक्रमित बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे, ज्ञानेश्वर चव्हाण, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर सहाने, तालुकाप्रमुख भाऊसाहेब डांगे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल थोरात, समीर भावनाथ, यश भावनाथ, साई चव्हाण, संदीप सहाने, आकाश डांगे, सूरज थोरात, रतन नवले, लक्ष्मण भावनाथ, संपत ढबाले, माऊली आडके, संतोष थोरात, किसन थोरात आदींसह नागरिक सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -