घरताज्या घडामोडीविनावेतन: दहा हजार शिक्षकांवर उपासमारीची वेळ

विनावेतन: दहा हजार शिक्षकांवर उपासमारीची वेळ

Subscribe

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

नाशिक : गेल्या 10 वर्षांपासून वाढीव पदांवर विनावेतन काम करणार्‍या दहा हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. यात माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षक, 20 टक्के अनुदानावर काम करणारे आणि वाढीव पदांवर कार्यरत शिक्षकांचा समावेश आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या शिक्षकांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने केली आहे. राज्यातील 1779 शाळा, 598 तुकड्या व 1929 अतिरीक्त शाखांवरील एकूण नऊ हजार 884 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे. अर्थ विभागाने त्यासाठी 106 कोटी 74 लाख रुपयांची तरतूद मंजूर केली असताना अद्याप शासनादेश निर्गमित झालेला नाही.  

- Advertisement -

वेतनाचा तिढा

राज्य शासनाने कर्मचार्‍यांचे वेतन 50/75/100 च्या सूत्रानुसार मार्च महिन्याच्या पगाराबाबत परिपत्रक काढले आहे. मात्र, मार्च महिन्याचे शिक्षकांचे वेतन हे शंभर टक्के देण्यासंबंधी वेतन पथकाकडे सादर केले आहे. नव्याने पगारपत्रक तयार करणे सद्यस्थितीस शक्य होणार नाही. त्यामुळे वेतन पथक अधिक्षकांना शासनाच्या सूचनांप्रमाणे वेतन देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाने केली आहे.

- Advertisement -

बारावीचे पुस्तके ऑनलाईन द्या!

करोनामुळे सर्व शिक्षक घरीच असल्यामुळे त्यांना अध्यायनासाठी बारावीची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची मागणी महासंघाने केली आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावर ’पीडीएफ’ स्वरुपात उपलब्ध करुन द्यावे. त्याचे शिक्षकांना ऑनलाईन वाचन करता येईल. याबाबत बालभारतीस आदेश देण्याचे आवाहन केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -