घरमहाराष्ट्रनाशिकअप्पर जिल्हाधिकारी नडे यांच्यावर अनियमिततेचा ठपका

अप्पर जिल्हाधिकारी नडे यांच्यावर अनियमिततेचा ठपका

Subscribe

वादग्रस्त १७४ फाईल्स मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे

मनीष कटारिया | नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या निवासस्थानातून चार महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या १७४ फाईल्स पुढील कार्यवाहीसाठी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस नाशिक मुख्यालयी उपस्थित राहून प्रकरणेचालवून निर्णय घ्यावे, असे आदेश देण्यात आले असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजते.

नडे यांचे गोल्फ क्लबजवळ निवासस्थान आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या घराजवळच दुसरेही एक शासकीय निवासस्थान आहे. त्या ठिकाणी नडे यांचा राबता असल्याचीसूरज मांढरे यांनी कारवाई करत नडे यांच्या निवासस्थानातून सुमारे १७४ संचिका ताब्यात घेतल्या. मात्र, या संचिकांबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली याबाबत प्रशासनाने सोयीस्कर मौन बाळगले. जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात प्रशासनाकडून याबाबत सोयीस्कर मौनबाळगण्यात आले. मात्र, आता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यात लक्ष घालत नडे यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवल्याचे समजते. त्यानंतर नडे यांच्याकडील आरटीएस अपिलाच्या १३१ संचिका व ग्रामपंचायत विवादाच्या ४१ संचिता अशी १७४ प्रकरणे मालेगाव अपरजिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांच्याकडे पुढील सुनावणीसाठी वर्ग करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार संबंधित अधिका-यांनी नाशिक मुख्यालयी उपस्थित राहून सदर प्रकरणे निकाली काढावीत, असेही आदेशित करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -