Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिव्यांग कर्मचार्‍यांना लॉकडाऊनमध्ये सुट्टी

दिव्यांग कर्मचार्‍यांना लॉकडाऊनमध्ये सुट्टी

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या कालावधीत शासकीय कार्यालयांमध्ये अवघे १० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात दिव्यांग कर्मचार्‍यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात येत असल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा देण्यासाठी दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली नसल्याने तसेच दळणवळणाच्या अडचणींचा त्यांना सामना करणे कष्टप्रद होते. लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी दिव्यांग कर्मचार्‍यांना सुट द्यावी, अशी मागणी संघटनेने केली होती.

त्या मागणीचा विचार करत शासनाने उपस्थितीबाबत दिव्यांग अधिकारी-कर्मचारी यांना सूट दिली आहे.  दिव्यांग कर्मचारी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील, राज्याध्यक्ष साईनाथ पवार, राज्यसचिव ललित सोनवणे, राज्य कोषाध्यक्ष विलास भोतमांगे, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद लोखंडे, जिल्हा सचिव जिभाऊ निकम, सतीष लाड, सुभाष वाघ, सोमा भालनोर, रामदास वाघ यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisement -