घरताज्या घडामोडीनव्या व्हेरियंटच्या धास्तीने नाशिकमध्ये लसीकरण केंद्रांवर पुन्हा रांगा

नव्या व्हेरियंटच्या धास्तीने नाशिकमध्ये लसीकरण केंद्रांवर पुन्हा रांगा

Subscribe

बाजारपेठांमधील गर्दीसह सभा-सोहळ्यांमधील उपस्थितीने वाढवली चिंता

पंचवटी – दक्षिण आफ्रिकेत नव्याने आढळलेल्या ओमिक्रॉनची चांगलीच भीती केंद्र आणि राज्य शासनाने घेतली आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेची चिंता सर्वांनाच सतावू लागल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या लसीकरणाला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात झाली असून शहरी भागासह ग्रामीण भागात लसीकरणासाठी लसीकरण केंद्राबाहेर लस घेणार्‍यांच्या रांगा लागू लागल्या आहेत.

केंद्रास राज्य शासनाने दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय नको म्हणून सर्वच प्रकारची निर्बंध शिथिल केली होती. त्यामुळे अनेकांना सॅनिटायझर मास्कसह कोरोनाचा यांचा विसर पडला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेसह विविध देशांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रादुर्भाव वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना काळात राज्यातील जनतेची घ्यावयाची काळजी व सूचनाही केल्या आहेत. या नव्या व्हायरसचे रुग्ण महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्बंध नव्याने घातले आहेत. आफ्रिकेत नव्याने आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणुमुळे प्रशासनाने भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे मास्कचे बंधन नव्याने घातले आहे. याचा परिणाम म्हणून शहरी भागासह ग्रामीण भागातील लसीकरणासाठी नागरिकांचा सहभाग वाढला आहे.

- Advertisement -

लसीच्या पहिल्या डोससह दुसरा डोस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यात अद्यापपर्यंत लसीकरणापासून दूर राहिलेल्या किंवा पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्‍या डोसबाबत निष्काळजीपणा दाखविणारे नागरिकही लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

विविध कार्यक्रमांमधील गर्दीचे काय?

प्रशासनाने करोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत धास्ती व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी लग्नसमारंभातील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा पन्नास टक्के उपस्थितीसाठी आग्रही असतानाच शहरातील अनेक विवाह समारंभास मोठी गर्दी उसळत आहे. यात राजकारणात सक्रिय असलेल्या मुला-मुलींच्या विवाहास मोठी गर्दी उसळत आहे. दुसरीकडे राजकारणाशी संबंध नसलेल्या अनेकांच्या विवाह सोहळ्यासह वाढदिवस, वास्तूशांती, साखरपुडा, दशक्रिया विधी, बारावे-तेरावे तसेच वर्षश्राद्धालाही मोठी गर्दी उसळत असल्याने अशा परिस्थितीत प्रशासन केवळ कारवाईची भिती दाखवत आहे. गेल्या काही दिवसांत कोणावरही कारवाई झाल्याचे दिसत नाही.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -