घरमहाराष्ट्रनाशिकमुनिश्री प्रसन्नसागरजी यांचा मंगल प्रवेश सोहळा; आजपासून धार्मिक कार्यक्रम

मुनिश्री प्रसन्नसागरजी यांचा मंगल प्रवेश सोहळा; आजपासून धार्मिक कार्यक्रम

Subscribe

अंतर्मना १०८ मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराजांच्या श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी येथील मंगल प्रवेश सोहळ्यानिमित्त रविवारपासून, २४ फेब्रुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंतर्मना १०८ मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराजांच्या श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी येथील मंगल प्रवेश सोहळ्यानिमित्त रविवारपासून, २४ फेब्रुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत रॅलीसह धार्मिक कार्यक्रमांचा आनंद समाजबांधवांना घेता येणार आहे.

रविवारी सकाळी ८ वाजता मांगीतुंगी देवस्थान परिसरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर बाईक रॅलीचे उपस्थित मान्यवरांकडून स्वागत होईल. सकाळी ९ वाजता विश्वहितंकर सातिशय चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांचा मस्तकाभिषेक सोहळा होईल. दुपारी २ वाजता नव्याने उभारण्यात आलेल्या धर्मशाळेचे लोकार्पण केले जाईल. तसेच, चिंतामणी पार्श्वनाथ जिनालयाचा जिर्णोद्धार पूर्ण झाल्याने ८१ कलशपूजनाने मंदिर शुद्धी कार्यक्रम होईल. त्यानंतर पूज्यश्रींचे चरण प्रक्षालन, शास्त्र भेट, गुरू पूजन, प्रवचन इ. कार्यक्रम होतील. सायंकाळी ७ वाजता सामूहिक प्रतिक्रमण, आनंद यात्रा आणि महामंगल आरती होईल.

- Advertisement -

सोमवारी पहाटे साडेतीनपासून जिनेंद्र महाअर्चना, सकाळी ७ वाजता पहाड वंदना होईल. दुपारी ४ वाजता भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या २१ फूट इंच प्रतिमेचा मस्तकाभिषेक सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सामुहिक प्रतिक्रमण, आनंद यात्रा आणि मंगल आरती होईल. या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक समाजबांधवांनी सहभागी व्हावे, तसेच रविवारी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुमेरकुमार काले, उपाध्यक्ष प्रमोद अजमेरा, महामंत्री प्रा. उपेंद्र लाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -