घरक्राइमपोलीस ठाण्यासमोरच वाहनाची धडक; वृद्धा ठार

पोलीस ठाण्यासमोरच वाहनाची धडक; वृद्धा ठार

Subscribe

पोलीस ठाण्यासमोर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत वयोवृद्ध महिला ठार झाल्याची घटना नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर,नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील कोकाटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ७० वर्षीय अनोळखी महिला नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोरुन पायी जात होती. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

१५ फुटांवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकामाच्या ठिकाणी फ्लास्टरचे काम करत असताना १५ फुटांवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संतोष नागनाथ हातांगळे (वय ३५, रा.फुलनेगर, पंचवटी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष हातांगळे बांधकामाच्या ठिकाणी प्लास्टरचे काम करीत होते. त्यावेळी ते तोल गेल्याने १५ फूट ऊंचीवरुन खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार ए. आर. पठाण करत आहेत.

वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत वयोवृद्ध ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुभाष रामदास शेटे (व ५८, रा.भगूर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुभाष शेटे हे नाशिकरोडवरील स्टेट बँकेच्या पुलाखाली आले होते. त्यावेळी अनोळखी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस नाईक महाजन करत आहेत.

- Advertisement -

गळफास घेत युवकाची आत्महत्या

राहत्या घरी युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सचिन हिरामण साळुंखे (वय ३२, रा. म्हाडा इमारत, भारतनगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नावे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन साळुंखे यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.

छपरी तालीम गेटसमोरची दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना बुधवारपेठ, छपरी तालीम गेटसमोर, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी डेव्हिड वाल्हे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डेव्हिड वाल्हे यांनी दुचाकी छपरी तालीम गेटसमोर पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. पुढील तपास पोलीस नाईक काकड करत आहेत.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना औरंगाबाद रोड, माडसांगवी टोलनाका, नाशिक येथे घडली. याप्रकरणी शरद आगळे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शरद आगळे हे कारने औरंगाबाद रोडने जात होते. त्यांनी कार टोलनाक्याजवळ पार्क करुन पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी शिलापूर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पुढील तपास पोलीस हवालदार गांगुर्डे करत आहेत.

 

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -