घरताज्या घडामोडीनाशिक महापालिका का खरेदी करणार तब्बल साडेसात कोटींची वाहने ?

नाशिक महापालिका का खरेदी करणार तब्बल साडेसात कोटींची वाहने ?

Subscribe

स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत घेतला निर्णय; अग्निशमन विभागात दाखल होणार ही वाहने

एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीत (युनिफाईड डीसीपीआर) गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आल्याने आता इतक्या उंच इमारतींत दुर्घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी अग्निशमन विभागात सहा बहुउद्देशिय वाहने (वॉटर मल्टीपर्पज) खरेदी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. १) झालेल्या सभेत घेण्यात आला. सुमारे साडेसात कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवा कंदील दाखवला.

सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची ऑनलाईन सभा पार पडली. नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. युनिफाईड डीसीपीआरच्या मंजुरीनंतर शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्यस्थितीत नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. सद्यस्थिती महापालिकेकडे २७ अग्निशमन वाहने आहेत. त्यात आठ वॉटर टेंडर, सहा वॉटर ब्राऊझर, तीन क्विक रिस्पॉन्स वेईकल, एक ब्रिदींग ऑपरेटर व्हॅन, दोन इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन, पाच वॉटर मिस्ट, एक फोम टेंडर व ३२ मीटर हायड्रोलिक शिडीचा समावेश आहे.या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेची अग्निशमन यंत्रणा पुरेशी नाही. त्यातच यातील पाच अग्निशमन वाहने चौदा वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. त्यामुळे सहाही विभागांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे नवीन सहा बहुउद्देशीय वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

- Advertisement -

नव्याने खरेदी करण्यात येणार्‍या वाहनांमध्ये पाणी, फोम, कार्बन डायऑक्साईड टॅन्क, ड्राय केमिकल पावडर राहणार आहेत. आग लागणे, विद्युत जनित्र जळणे, केमिकल कंपनीला आग लागणे किंवा केमिकल वाहून नेणार्‍या वाहनांना आग लागल्यास एकाचं प्रकारचे वाहन आग विझविण्यासाठी उपयोगी पडेल अशी सुविधा उपलब्ध असणार आहे.

९० मीटर हायड्रोलिक शिडी

नव्याने मंजूर झालेल्या युनिफाईड डीसीपीआरमधील तरतुदींनुसार शहरात ७० मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अशा इमारतींमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा इमारतींकरीता ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी हायड्रोलिक शिडी खरेदी करण्याचा प्रस्तावही महापालिकेकडून तयार केला जात आहे.

नाशिक महापालिका का खरेदी करणार तब्बल साडेसात कोटींची वाहने ?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -