घरमहाराष्ट्रनाशिकशंभरी ओलांडलेल्या अडीच हजार मतदारांची पडताळणी

शंभरी ओलांडलेल्या अडीच हजार मतदारांची पडताळणी

Subscribe

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडलेल्या गटातील अडीच हजार मतदार आढळून आले आहेत. या मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी दिले आहेत.

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडलेल्या गटातील अडीच हजार मतदार आढळून आले आहेत. या मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या मतदारांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या हयात असण्याबाबत पडताळणी करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या (बीएलओ) मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

मोहीमेंतर्गत दुबार मतदारांचा शोध

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यात मतदार पुनरिक्षण मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेंतर्गत दुबार मतदारांचा शोध घेणे, पत्ता बदल, मतदारांची छायाचित्रे गोळा करणे अशा प्रकारे मतदार यादी अद्यावतीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नवमतदारांच्या नोंदणीवर विशेष भर दिला. याकरता शहरातील महाविद्यालयांमध्ये मोहीम राबवण्यात येऊन १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण करणार्‍या मतदारांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मतदार पुनरिक्षण मोहीमेंतर्गत १ सप्टेंबर अखेर सुमारे साडेचार लाख मतदारांची नोंद करण्यात आली. या सर्व तयारीचा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी आढावा घेतला. या मोहीमेंतर्गत जिल्ह्यात शंभर किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील सुमारे अडीच हजार मतदार असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील शंभर वयोगटातील मतदारांची यादी तालुकानिहाय यादी तयार करण्यात येऊन बीएलओंमार्फत ३१ डिसेंबर पर्यंत या मतदारांच्या भेटी घेण्यात येऊन आयोगाला अहवाल देण्यात येईल.
– गणेश राठोड, तहसिलदार निवडणूक शाखा

मागील लोकसभा निवडणूकीत मतदार यादीत मोठा गोंधळ निर्माण झाल्याने राजकीय पक्षांनी निवडणूक विभागावर ताशेरे ओढले होते. मागील अनुभव लक्षात घेता विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. याकरता आता शंभर वयोगटातील मतदारांची तालुकानिहाय यादी तयार करून त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून खातरजमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. तसेच आदेश मतदार केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना बीएलओ देण्यात आले आहेत.

- Advertisement -

का घेतला निर्णय

मृत व्यक्तींचीही नावे मतदार यादीत येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला नेहमीच प्राप्त होतात. त्यात विशेषत: शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या लक्षणिय असते. यातील अनेक मतदार मृत असले तरीही त्यांच्या नावाने बोगस मतदान होत असल्याचा संशय आहे. या पार्श्वभुमीवर शंभरी ओलांडलेल्या मदतारांच्या घरी जाऊन शाहनिशा करण्याचा फंडा यंदा निवडणूक विभागामार्फत वापरण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -