घरक्राइमदिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी थेट पिस्तुलातून झाडल्या हवेत गोळ्या; व्हिडिओ वायरल होताच झाली...

दिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी थेट पिस्तुलातून झाडल्या हवेत गोळ्या; व्हिडिओ वायरल होताच झाली गोची

Subscribe

नाशिक : गत दिवाळीमध्ये परवानाधारक पिस्टलमधून हवेत फायरिंग करत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करणार्‍या ध्रुवनगर परिसरातील तरुणास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दीड लाखांचे पिस्टल जप्त केले. आकाश संजय आदक (वय २४, रा. प्लॉट नं. ६०, साईनाथ मंदिराजवळ, ध्रुवनगर, सातपूर, गंगापूर लिंकरोड, नाशिक) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना सोमवारी (दि.३०) ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीमध्ये एका तरुणाने रात्रीचे वेळी बेकायदेशीररित्या पिस्टलमधून हवेत फायर केले होते. शिवाय, त्याने फायरिंगचा व्हिडीओ तयार करुन तो सोशलमीडियावर व्हायरल केल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस अंमलदार मरकड यांनी वरिष्थ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. त्यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करुन तरुणाचा शोध घेणेकामी पोलीस अंमलदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझिमखान पठाण, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख यांना पाठविले. पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे बेकायदेशीररित्या पिस्टलमधून हवेत फायर करणार्‍यास संशयित आकाश आदक यास घरातून अटक केली. पोलिसांनी त्याचेकडेे दिवाळीमध्ये पिस्टलमधूनन केलेल्या फायरबाबत विचारणा केली असता त्याने फायर केल्याचे व त्याची व्हिडीओ क्लिप काढून सोशनमीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाठी पथकाने त्यस गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

 

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -