घरताज्या घडामोडीविश्वास नांगरे-पाटलांनी केला डॉक्टरांच्या कार्याला सलाम

विश्वास नांगरे-पाटलांनी केला डॉक्टरांच्या कार्याला सलाम

Subscribe

आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्यसेवक कोरोनाशी थेट सामना करीत आहेत. प्रत्यक्ष सामना असल्याने त्यांचा जीव अधिक धोक्यात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व संशयितांवर उपचार करणार्‍या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन त्यांच्या कार्याला सलाम केला.

- Advertisement -

नाशिक शहर सहा आठवड्यांपासून लॉकडाउन आहे. त्यातच नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२४ झाला आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिचारिका, वॉर्डबॉय, चतुर्थश्रेणी कर्मचारी असे सारे आरोग्यसेवक अहोरात्र सेवा देत आहेत.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांची सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती करून घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. संजय गांगुर्डे, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनीही कोरोना कक्षासह जिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. नांगरे-पाटील यांनी सिव्हिलमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामकाजाचे कौतुक करीत त्यांचे मनोबल वाढविले. त्यांच्या कामकाजासाठी प्रशस्तिपत्रही प्रदान केले. यावेळी उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह पोलिस अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -