घरमहाराष्ट्रनाशिकविठाईला बिघाडाचे ग्रहण

विठाईला बिघाडाचे ग्रहण

Subscribe

जुन्या चेसीजवर नव्या बॉडी बसविलेल्या गाड्यांमध्ये तांत्रिक त्रुटी

एसटी महामंडळाने नाशिकसह राज्यभर सुमारे 1200 बसगाड्या विठाई नावाने ताफ्यात समाविष्ठ केल्या आहेत. यातील बहुतेक गाड्या जुन्या चेसिजवर नव्या बॉडी बसवलेल्या आहेत. त्यांचे इंजिनही जुनेच आहे. या गाड्या आता प्रत्यक्षात रस्त्यांवर धावत आहेत. मात्र, वारंवार तांत्रिक बिघाडामुळे या गाड्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र विविध आगारांत आणि मार्गावरही दिसत आहे.

एसटीच्या नाशिक विभागातील आगार क्रमांक 2 मधून शनिवारी (दि.13) पुण्याकडे विठाई मार्गस्थ झाली असता तिचा क्लच अर्धा ऑपरेटच होत नव्हता. तसेच गिअरबॉक्सही जाम. मात्र, वाहकूक फेर्‍यांच्या नियोजनानुसार ही गाडी तात्पुरता दुरुस्ती उपाय करण्यासाठी डेपोबाहेर घेऊन जाण्यास चालकाला सांगण्यात आले. त्यामुळे ही गाडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर प्रवाशांना बरेच कटू अनुभव आले. याबाबत आगाराने गुप्तता राखली असली तरी प्रवाशांच्या तक्रारींवरून या गाड्यांच्या तांत्रिक बिघाडांबाबत योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

महामंडळाने नाशिकसाठी 10 ते 12 विठाई बसगाड्या दिलेल्या आहेत. या गाड्या आता मार्गावर धावण्यासाठी सज्ज आहेत. चकाचक लुक, गाडीच्या दोन्ही बाजूला कटीवर हात ठेवलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचे स्टिकर्स, कुशन असलेल्या खुर्च्या, सेन्सरचे दरवाजे अशी गाडीची ठेवण आहे. मात्र, गाडीचा डोलारा हा जुन्या इंजिन आणि चेसीजवर उभारण्यात आलेला आहे. तसेच गाडीचा पत्रा अ‍ॅल्युमिनियमऐवजी लोखंडी वापरण्यात आला आहे. त्यामुळे गाडीचे वजन वाढले आहे. तसेच गाडीला उंची मिळाल्याने खालच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी डिकी बनविण्यात आल्या आहेत. यात मुख्य म्हणजे गाडीच्या तांत्रिक अडचणी आता जुन्या इंजिनमुळे पुढे येत आहेत. त्यामुळे या गाड्या शिवशाहीप्रमाणे रस्त्यात बंद पडून अथवा अपघात होऊन त्रासदायक ठरू नयेत, असे मत त्रस्त प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

आकर्षक स्टिकर्सबॉडी चढवून आगारांमध्ये या गाड्या दाखल होत आहेत. त्यानंतर गाड्यांना दोन्ही बाजूला स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तसेच पांढर्‍या रंगाचा पट्टा मारण्यात येत आहे. गाडीमध्ये टू बाय टू कोच आहेत. तसेच सामान, बॅग ठेवण्यासाठी रॅक आहेत. गँगवेमध्ये रिकामी जागा मुबलक आहे. गाड्यांच्या काचा जादा हवेशीर असल्याने प्रवाशांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

साध्या तिकीट दरात प्रवास

परिवर्तन गाड्यांप्रमाणेच विठाईचे दर आहेत. त्यामुळे गाडी जरी लक्झरीअस असली, तरी साध्या दरानेच प्रवास करता येत आहे. काही प्रवाशी अजूनही या गाडीला जादा दर असल्याचे समजून लाल डब्याची वाट पाहत बसस्थानकात उभे असल्याचेही दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -