मतदान केंद्रावरील रांगेत उभे राहून जिल्हाधिकारी मांढरे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २९ एप्रिलला सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सूक्ष्म नियोजनात व्यस्त असतानाही, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदींनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक नखाते यांनी आईवडीलासमवेत मतदान केले
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी आनंदकर यांनीही सपत्निक मतदानाचा हक्का बजावला.