घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समित्यांसाठी 17 जानेवारीला मतदान

बाजार समित्यांसाठी 17 जानेवारीला मतदान

Subscribe

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकां मध्ये बदल

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा मुदतवाढ मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच
18 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
जिल्ह्याातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा आदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळ या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाची लाट आटोक्यात आल्यानंतर, सहकार विभागाने राज्यातील स्थगित केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बँकांना निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाशिक जिल्हा बँकेवर प्रशासन असल्याने आणि बँकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने, बँकेची निवडणूक ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आला होता. ही मुदतवाढ संपुष्टात येण्यापूर्वीच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला.

नाशिक जिल्ह्यात १७ बाजार समित्या असून, त्यांपैकी १५ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान संपुष्टात आलेली आहे. यात महत्त्वाच्या असलेल्या नाशिक, पिंपळगाव व लासलगाव यांसह नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समित्यांच्या समावेश आहे. या बाजार समित्यांच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे.

 

 

निवडणूक कार्यक्रम असा.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित करणे :१६ डिसेंबर

नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृती : १६ ते २२ डिसेंबर
नामनिर्देशनपत्र प्रसिद्धी :१६ डिसंबर ते २२ डिसेंबर
नामनिर्देशनपत्र छाननी :२३ डिसेंबर
वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी : २४ डिसेंबर
अर्ज माघारी : २४ डिसेंबर ते७ जानेवारी २०२२
निवडणूक चिन्ह वाटप, उमेदवारी यादी प्रसिद्ध : १० जानेवारी
मतदान : १७ जानेवारी
मतमोजणी व निकाल :१८ जानेवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -