घरताज्या घडामोडीसावधान: नाशिक शहरात तब्बल ५३० हायरिक्स रुग्ण

सावधान: नाशिक शहरात तब्बल ५३० हायरिक्स रुग्ण

Subscribe

४६ पॉझिटिव्ह रुग्ण; ९६५ लो रिस्क रुग्ण

नाशिक : शहरात करोनाचे तब्बल ४६ पॉझिटिव्ह रुग्ण आजवर आढळून आले असून त्यामुळे हे रुग्ण जेथे राहातात त्या ३४ भागांना महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. या प्रतिबंधित क्षेत्रांचे वैद्यकीय सर्वेक्षण महापालिकेने केले असता त्यात तब्बल ५३० हाय रिस्क रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ९६५ रुग्ण लो रिस्कचे आढळून आले आहेत. सातपूरमध्ये आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तेथे तब्बल ६४ हायरिस्क रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात मालेगावमध्ये सर्वाधिक रुग्ण असले तरी नाशिकला त्याचा प्रार्दुभाव होत आहे. स्थलांतरीत किंवा इतर शहरातून नाशिकमध्ये आलेल्या व्यक्तींना करोना एरियाची हिस्ट्री असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी स्थलांतरीतांना रोखण्याचे आवाहन केले होते. मालेगावच्या तुलनेत नाशिकमध्ये रुग्णसंख्या कमी असली तरी हायरिस्क रुग्णांचे प्रमाण खूप आहे. नाशिकरोड, नवश्या गणपती, सिडको, सातपूर, शिवाजी नगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कमी रिस्क असलेल्या रुग्णांची संख्या साडेनऊशे आहे.

जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

प्रतिबंधित क्षेत्र–हायरिस्क—लो रिस्क— पॉझिटिव्ह रुग्ण

  1. सिडको ——20——42—–1
  2. नवश्या गणपती—10—–09——-1
  3. नाशिकरोड—–33—–40——2
  4. समाजकल्याण—12—-153—–1
  5. शिवाजीनगर—-52—-53—-5
  6. म्हसरुळ——5—–27—-1
  7. सावतानगर—8——0—–1
  8. उत्तमनगर—-19—–21—-1
  9. पाथर्डीफाटा —-7—-18—–2
  10. सातपूर—–64—–247—-8
  11. जनरल वैद्यनगर—5—-24—1
  12. बजरंगवाडी—-18—-20—1
  13. शांतीनिकेतनचौक–2—-23–1
  14. मानेक्षानगर—6—-22—-1
  15. समतानगर—-2—13—-1
  16. पाटीलनगर—-29—–12—2
  17. हनुमानचौक, सिडको-31—-13—-1
  18. जाधव संकुल—-21 —-14—-1
  19. हिरावाडी—–3—–0—–1
  20. श्रीकृष्णनगर —-20 —8—1
  21. इंदिरानगर—-13—-16—-1
  22. तारवालानगर—-10—-25—-1
  23. आयोध्यानगरी,हिरावाडी-2—0—0
  24. कोणार्कनगर-२—–4—-0 —0
  25. सागर व्हिलेज—– 2—-0—-1
  26. हरी दर्शन——-4—–0—-1
  27. सिन्नर फाटा—–12—-11—-1
  28. काठेगल्ली——3—–42—-1
  29. नवश्या गणपती— 21—-23 —-1
  30. गोसावीवाडी—–26—-16—-1
  31. कुंभारवाडा—–16—-20—-1
  32. अमेय अपार्टमेंट,ना.रोड-11—-9—-1
    एकूण—-530—–965—–46
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -