Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक सावधान : फेसबुक अकाउंट हॅक करुन केली जातेय फसवणूक

सावधान : फेसबुक अकाउंट हॅक करुन केली जातेय फसवणूक

व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक फटका

Related Story

- Advertisement -

शहरासह ग्रामीण भागातील फेसबुक अकाउंट हॅक करून संबंधितांच्या मित्रांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उजेडात आला असून, सर्व फेसबुकधारकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देवळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागणीचा प्रकार घडला होता. त्यात अनेकांना आर्थिक फटका बसल्याने त्यांनी वेळीच खबरदारी घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसाच प्रकार येथील ठेकेदार व पत्रकार दिनेश सोनार यांच्या बाबतीत घडला असून, त्यांचे फेसबुक अकाऊंट खाते हॅकर्सने हॅक करून त्या फेसबुक अकाउंट वरील मेसेंजरवर संदेश पाठवून अनेकांकडे पैशांची मागणी केली. त्यात दिनेश सोनार यांचे मित्र सचिन काशिनाथ धामणे यांचेकडून फोन पे मार्फत कमलेश या नावाने ९४६०९७३१६९ या मोबाईल क्रमांकावर रक्कम रुपये पंधरा हजार, तसेच चेतन संतोष सूर्यवंशी यांचेकडून सात हजार रुपये घेतले आहे. अनेक मित्रांना त्याने खाते नंबर ९१८२२२२८२९७५० IFC PYTM 0१२३४५६ वर पैशाची मागणी केलेली आहे. त्यामुळे अनेक मित्रांनी पैसे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ९६७८६०५०३४ या नंबर वरून व्हॉटस्अ‍ॅप वरूनसुद्धा पैसे मागण्यात आले आहेत. त्यामुळे दिनेश सोनार यांनी तात्काळ देवळा पोलिसात तक्रार दाखल करून संबंधित हॅकर्सचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -