घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील पाणीकपात रद्द

नाशिकमधील पाणीकपात रद्द

Subscribe

पावसाची कृपा; महापौरांनी जाहीर केला निर्णय

गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण ८० टक्के भरले आहे. त्यामुळे शहरातील एक वेळची पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. परिणामी नाशिककरांना आता दोन वेळेचा पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होणार आहे.

शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पावसाने ओढ दिल्यानंतर दर गुरुवारी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभापासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे गुरुवारची पाणी कपात १५ जुलैला रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण साठा ८० टक्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी पाणी कपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

नऊ दिवसांचे पाणी वाचले

३० जूनपासून शहरात दररोज एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच चार गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या कपातीमुळे नऊ दिवस पुरेल इतकी पाण्याची बचत झाली, असे प्रशासनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -