Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र पाऊसकृपा : नाशिक जिल्हयातली ११ धरणं ओव्हर फ्लो

पाऊसकृपा : नाशिक जिल्हयातली ११ धरणं ओव्हर फ्लो

धरण समूहात ७४ टक्के पाणीसाठा; गंगापूर, दारणा ९८ टक्के भरले

Related Story

- Advertisement -

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे नाशिक जिल्हयातली धरणं भरत आली असून, ७ धरणं ओव्हर फ्लो झालीहेत. तर, ८ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा उपलब्ध झालाय. शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ९८ टक्के, तर दारणा धरण ९७ टक्के भरलं असून, त्यातून विसर्ग सुरू झालाय.

जिल्हयातील ७ मोठ्या आणि १७ मध्यम अशा २४ धरणप्रकल्पांची साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दलघफू एवढी आहे. सद्यस्थितीत जिल्हयातल्या धरणांत ४८ हजार ७२१ दलघफू म्हणजेच ७४ टक्के जलसाठा उपलब्ध झालाय. गेल्यावर्षी जिल्हयात ९२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा १८ टक्के पाणीसाठा कमी असला तरी, नाशिककरांवरील पिण्याचे पाण्याचं संकट टळलंय. आळंदी, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज धरण १०० टक्के भरलंय. तर काश्यपी, गौतमी-गोदावरी, वाघाड, पुणेगाव, मुकणे, नांदुरमधमेश्वर, गिरणा, पूनद या धरण प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झालाय.

११ धरणांतून विसर्ग सुरू

- Advertisement -

जिल्हयातल्या ११ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात गंगापूर, आळंदी, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

- Advertisement -