उद्या नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद

जलवाहिन्यांच्या दुरूस्तीची कामे महापालिकेच्या वतीने हाती घेतली जाणार असल्याने शुक्रवारी(दि.१९) शहरातील बहुतांश भागात सकाळ, दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रास पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) १२०० मी.मी.व्यासाची रॉ-वॉटर पाईप लाईन गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, मनोहर नगर परिसरात नादुरूस्त झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहीनीची गळती थांबविण्याचे काम केले जाणार असल्याने शुक्रवारी(दि.१९) शहरात सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवारी(दि.२०) सकाळचा पाणीपुरवठ ा कमी दाबाने होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या परिसरात पाणी येणार नाही

नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. १४ भागश:, १५ भागश:,२३ भागश:, ३० भागश: प्र.क्र. १६ पुर्ण
नाशिक पश्चिम मधील प्रभाग क्र. ७, १२ व १३ मधील संपुर्ण भाग
पंचवटी विभागातील प्रभाग क्र. १,२,३,४,५ व ६ मधील संपुर्ण भाग
नाशिक रोड विभागातील प्रभाग क्र. १७, १८, १८, २०, २१ व २२
नविन नाशिक विभाग प्रभाग क्र. २५ भागश:, २६ भागश: व २८ भागश:
सातपुर विभाग प्रभाग क्र. ८, ९, १०,११,२६, २७ चुंचाळे व दत्त नगर परिसर