घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांनो..! आजचा पाणी पुरवठा बंद

नाशिककरांनो..! आजचा पाणी पुरवठा बंद

Subscribe

आज एक दिवसाचा पाणी पुरवठा पूर्ण बंद, शुक्रवारी सुरळीत होणार पाणी पुरवठा

गंगापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत गुरुवार (ता.४) पासून आठवड्यातून एक दिवसाचा पाणी पुरवठा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ४ जुलैला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलकुंभ गुरुवारी सायंकाळीच भरले जाणार असल्याने शुक्रवारच्या पाणीपुरवठ्यावर या ‘ड्राय डे’चा परिणाम होणार नाही, असे महापालिका प्रशासनाने ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपासून शहर परिसरात पाऊस होत असला तरीही धरणक्षेत्रात मात्र पावसाने दडी मारली आहे. गेल्या चार दिवसात गंगापूर धरणात अवघे १ टक्का पाणीसाठा वाढला आहे. शहरास गंगापूर धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा होतो. पावसाने दडी मारल्याने हे धरण तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. निम्नतम पातळीवरील पाणी उचलण्याची व्यवस्था नसल्याने शहराची पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प होऊ शकते, असा इशारा आधीच पालिका प्रशासनाने दिला होता. सध्या शहरातील बहुतांश भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, दररोज एक वेळ पाणी पुरवठा केल्यास १० टक्के पाणी बचत होणार आहे. यातून रोज ५५ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल. उपलब्ध पाणी साठा कमी असल्याने नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -