आम्ही सदैव उद्धव ठाकरेंसोबतच

निफाड येथील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अनिल कदम यांचे प्रतिपादन

ओझर :  शिवसेना ही लढाऊ संघटना आहे. शिवसेनेला अनेकदा बंडखोरीचे ग्रहण लागले मात्र तरीही पुन्हा नव्या जोमाने शिवसेना अभेद्य राहिली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत घडणार्‍या राजकीय घडामोडी व सत्तासंघर्ष अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे सर्वांचे जात, धर्म, गोत्र हे शिवसेना असून निफाड तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक सदैव पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले.

निफाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना पदाधिकारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जि.प सदस्य दीपक शिरसाठ, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, नगरसेवक मुकुंदराजे होळकर, संजय कुंदे, प्रदीप अहिरे, संजय धारराव, माजी सभापती राजेश पाटील, किरण लभडे, सोमनाथ पानगव्हाणे, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, खंडू बोडके-पाटील, बाळासाहेब चारोस्कर, नितीन काळे, प्रशांत पगार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनिल कदम म्हणाले की, शिवसेनेने आपल्याला भरभरून दिले आहे. त्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार शिवसैनिकांच्या नसानसात भिनलेले आहे. त्यामुळे स्वार्थासाठी पक्ष सोडणार्‍यांची पर्वा कधी शिवसैनिकांनी केली नाही व करणारही नाही. त्यामुळे भविष्यात अधिक जोमाने शिवसैनिकांनी सक्रिय होऊन मुख्यमंत्री ठाकरेंचे हात बळकट करावे व निफाड तालुक्यात आपला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरून भगवा फडकवा, असे आवाहनही कदम यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना केले. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शिवसैनिक खंडू बोडके-पाटील, अभिजित चोरडिया, अशपाक शेख, दत्तू भुसारे, योगेश कुयटे, नाना तिडके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस नंदू कापसे, संजय कुंदे, किशोर जावरे, प्रकाश महाले, स्वप्नील कदम, अंगुर कदम, सुभाष आवारे, सत्यजित मोरे, आशिष बागुल, अरुण डांगळे, संदीप टरले, आबा गडाख, गणेश नाठे, देवेंद्र काजळे, बाळासाहेब सरोदे, समीर जोशी, संजय धारराव, रावसाहेब कुंदे, तुकाराम उगले, आरिफ मणियार, भाऊ घुमरे, शरद कुटे, जितेंद्र कुटे, अरुण घुगे, शाम जोंधळे, रतन गाजरे, सागर जाधव, राजेंद्र राजोळे, निलेश दराडे, भाऊलाल दराडे, रघुनाथ ढोबळे, नंदू पवार, भाऊसाहेब खालकर, आरिफ इनामदार, भगवान चव्हाण, रामदास खालकर, सागर चव्हाण, सागर बोडके, बाबाजी संगमनेरे, दौलतराव कडलग, बंडू अडसरे, नितीन गवळी, लक्ष्मण सोनवणे, सुनील सोनवणे, संदीप सांगळे, शिवनाथ सोनवणे, दीपक शिंदे, रंगनाथ सातपुते, शामआण्णा खालकर, साजन ढोमसे, रतन डेर्ले, सुभाष निफाडे उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचा अनिल कदमांना फोन

निफाड येथील शासकीय विश्रामगृहात अनिल कदम यांची शिवसेना पदाधिकार्‍यांसमवेत बैठक सुरू असतानाच बारा वाजेच्या सुमारास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांना फोन आला. सद्यस्थितीतील सत्तासंघर्षावर अनिल कदम यांच्याशी उद्धव ठाकरेंचे संभाषण सुरू असतानाच उपस्थित शिवसैनिकांनी उत्साहात जय भवानी – जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत निफाड शिवसेना उद्धव ठाकरेंसोबतच असल्याची ग्वाही दिली.