घरमहाराष्ट्रनाशिकमहालेंच्या घरवापसीने काय साध्य होणार?

महालेंच्या घरवापसीने काय साध्य होणार?

Subscribe

पक्षांतराची लागण आपल्या सैनिकांना होऊ नये म्हणून शिवबंधन बांधण्याचा रिवाज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाडला. मात्र, पक्षाशी इमान न राखता निष्ठूरपणे शिवबंधनाला कात्री लावणार्‍यांना पुन्हा एकदा शिवबंधनाच्या गाठी मारण्यात आल्याने जुना-जाणता शिवसैनिक अस्वस्थ झाला आहेे.

पक्षांतराची लागण आपल्या सैनिकांना होऊ नये म्हणून शिवबंधन बांधण्याचा रिवाज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाडला. मात्र, पक्षाशी इमान न राखता निष्ठूरपणे शिवबंधनाला कात्री लावणार्‍यांना पुन्हा एकदा शिवबंधनाच्या गाठी मारण्यात आल्याने जुना-जाणता शिवसैनिक अस्वस्थ झाला आहेे. धनराज महाले यांच्या रुपाने या नव्या पद्धतीला स्वातंत्र्य दिनानंतर सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवबंधन बांधण्याच्या हेतूलाच छेद दिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भाजप- शिवसेना युतीने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व कामगिरी केल्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धडकी भरली आहे. पराभवाच्या भीतीने धास्तावलेले राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक नेते युतीच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळे पुन्हा युतीचे पारडे जड भरणार असल्याचे सांगत सत्ताधारी नेत्यांनी वातावरण निर्मिती चालवली आहे. सत्ताधार्‍यांच्या प्रचारात विरोधक गर्भगळीत झाले असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत ही कोंडी फोडायची आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार डॉ. भारती पवार यांची उमेदवारी कापली गेली. याचा अचूक फायदा उठवत भाजपने त्यांनी उमेदवारी देऊन तब्बल तीन लाख मतांनी निवडून आणले. महालेंचा पराभव तर झालाच; पण जिल्हा परिषदेचे गटनेतेपदही सोडावे लागले होते. त्यामुळे राजकीय एकही पद आता त्यांच्याकडे राहिलेले नाही. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत राजकीय पुनर्वसन करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांचा पत्ता कट करून उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील दुरापास्त असल्यामुळे महालेंनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आता शिवसेना- भाजप युती झाली तरी ही जागा शिवसेनेकडे आहे; युती नाही झाली तरी शिवसेनेचा उमेदवार राहील. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.

- Advertisement -

शिवसैनिकांना शिवबंधन बांधून त्यांना पक्षाशी जोडण्याचे कार्य उद्धव ठाकरे यांनी सुरू केले. एकदा शिवबंधनात अडकल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही, अशी शपथ घेतली जाते. त्यामुळे पक्षाशी एकरूप होऊन निष्ठावंत राहणार्‍यांचे प्रमाण वाढते. या हेतूला अलीकडील काळात हरताळ फासला जात आहे. कोणीही पक्षात येतो, त्याला वाट्टेल तेव्हा शिवबंधन तोडून मोकळा होतो. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यानंतर आपल्याच विरोधात प्रचार केला आणि आता त्यांनाच पक्षात घेतले जात असेल, तर कोणते ‘शिवबंधन’ बांधले जात आहे, असे कोडे शिवसैनिकांना पडले आहे.

गावित, चारोस्करांचे काय?

दिंडोरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून भास्कर गावित इच्छुक आहेत. तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली तयारी दर्शवली आहे. त्यांनाही शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा प्रवेश लांबणीवर टाकत पक्षाने महालेंना पुन्हा शिवबंधन बांधले. त्यामुळे गावित व चारोस्करांचे काय होणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -