घरमहाराष्ट्रनाशिकजेव्हा सिटी सेंटर मॉलला लागते आग

जेव्हा सिटी सेंटर मॉलला लागते आग

Subscribe

अग्निशामक विभागाकडून करण्यात आलेल्या मॉक ड्रिल मुळे काही काही काळासाठी उडाली धांदल

नाशिक : वेळ दुपारी चारची अन् खरेदीसाठी सिटी सेंटर मॉलमध्ये आलेले शेकडो नागरिक.. अचानक मॉलमध्ये आग लागते आणि चौथ्या मजल्यावर काही नागरिक अडकल्याचे समजते. त्यामुळे मॉलमधील कर्मचारी व ग्राहकांची प्रचंड धांदल उडते. आग विझविण्याचा थरार पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे संपूर्ण वाहतूक जाम होते. अखेर हा सर्व प्रसंग अग्निशमन दलाचे मॉकड्रील सुरू असल्याची माहिती मिळताच सर्वांचा जीव भांड्यात पडतो.

अग्निशमन विभागातर्फे दरवर्षी १४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताह साजरा केला जातो. त्यात जनतेचे प्रबोधन व जवानांचे कौशल्ये सादरीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळवारी (दि.१९) सिटी सेंटर मॉल येथे अग्निशमन विभागाचे आग नियंत्रणाचे मॉक ड्रिल प्रात्यक्षिक पार पडले. सिटी सेंटर मॉल व्यवस्थापनाकडून आम्हाला आपली मदत पाठवा, असे सांगत अग्निशमन विभागाला आग लागल्याचा कॉल गेला. त्यानंतर काही मिनिटांत मुख्य अग्निशमन केंद्रावरील दोन, बंब रस्त्याने सायरन वाजवत या ठिकाणी हजर झाले आणि चौथ्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींना खाली सुरक्षित उतरवणे सुरू झाले, मुख्य अग्निशमन केंद्रावरील लेडिंग फायरमन इक्बाल शेख, श्याम राऊत, फायरमन विजय शिंदे, किशोर पाटील, वाहन चालक शरद देटके, अभिजित देशमुख यांच्यासह सहा ट्रेनी फायरमन यांनी मॉडेलमध्ये सहभागी होत आपले कौशल्य दाखवले. स्टेशन ऑफिसर राजेंद्र बैरागी यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -