घरताज्या घडामोडीलॉकडाऊन असताना व्हा ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिटनेस’, तंदुरूस्तीसाठी डॉ. रविंद्र सिंगल यांचा सोशल...

लॉकडाऊन असताना व्हा ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिटनेस’, तंदुरूस्तीसाठी डॉ. रविंद्र सिंगल यांचा सोशल उपक्रम

Subscribe

लॉकडाऊनमुळे शहरातील मैदाने, तालीम, जीम बंद असल्याने आरोग्याविषयी अधिक काळजी असणार्‍यांना वर्कआऊटशिवाय २१ दिवस कसे घालवावे, इतरांमध्ये व्यायामाची आवड निर्माण कशी करायची याचा प्रश्न पडला आहे. या पर्याय म्हणून नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त व औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी डॉ.रविंद्र सिंगल यांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिटनेस’नावाचा पब्लिक ग्रुप तयार करत आपापल्या फेसबुकमित्रांना वर्कआऊटचे फंडे देत अनोख्या पद्धतीने व्यायाम करण्यासाठी भाग पाडलय. या ग्रुपवर प्रत्येकाला व्यायामाचे व्हिडीओ, फोटो आणि माहितीसुद्धा अपलोड करत येणार आहे.

कोरोना आजाराने जगभर धुमाकुळ घातला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा, असे आवाहन केले जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक तंदुरूस्ती अर्थात फिटनेस ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या निरोगी व तंदुरुस्तीसाठी डॉ. सिंगल यांनी पुढाकार घेतला आहे. पुशअप्स, पुलअप्स, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यान यासारख्या शरीराला आणि मनाला तंदुरूस्त राखणार्‍या व्यायामाची जीवनशैली प्रत्येकाने अंगीकारण्यासाठी ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिट्नेस‘ नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपनुसार प्रत्येकाला झेपेल असा घरच्याघरी व्यायाम करण्यास सांगितले जात असून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी व्यायामाचे व्हिडीओ, फोटो व माहिती ग्रुपवर शेअर करण्यास सांगितले जात आहे. या ग्रुपवर सदस्यांना फिटनेस क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ ऑनलाईन मार्गदर्शनदेखील करणार आहेत.

- Advertisement -

अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिटनेससाठी नियम

फेसबुकवरील अ‍ॅम्बेसेडर ऑफ फिटनेस पेजवरील अ‍ॅक्टिविटीजसाठी काही नियम आहेत. जशी व्यायामासाठी एक शिस्त असते तशीच या पेजवरील सदस्यांसाठी एक शिस्त आहे.
या पेजवर व्यायाम, फिटनेस या विषयाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती अथवा वादग्रस्त मजकूर टाकायचा नाही. नियमभंग करणार्‍या व्यक्तीस हे ग्रुप सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -