Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र मविप्र संस्थेची साडेबारा एकर जमीन कोणाकडे; नीलिमा पवारांचा गौप्यस्फोट

मविप्र संस्थेची साडेबारा एकर जमीन कोणाकडे; नीलिमा पवारांचा गौप्यस्फोट

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत संस्थाबाह्य शक्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात माजी पालकमंत्र्यांकडे असलेली संस्थेची साडेबारा एकर जमीन आपल्या हातून जाते की काय, या भीतीपोटी ते आमच्याविरोधात प्रचार करत असल्याचा गौप्यस्फोट सरचिटणीस नीलिमा पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बुधवारी (दि.10) सत्ताधारी प्रगती पॅनलच्या संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यानंतर श्रध्दा लॉनमध्ये समर्थकांची सभा घेण्यात आली. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभापती माणिकराव बोरस्ते, रामचंद्रबापू पाटील, सुरेशबाबा पाटील, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, माजी आमदार मारोतराव पवार, शकुंतला वाघ, माजी आमदार राजाभाऊ वाजे, शंकरराव कोल्हे, सुरेश निकम, पंडितराव पिंगळे, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, केदा आहेर, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, माणिकराव शिंदे, दिलीप मोरे, दत्तात्रय पाटील, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, भास्कर बनकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. आर. के. बच्छाव, प्रमोद पाटील, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नाना महाले, दत्ता गडाख, विष्णू डेर्ले, बापूसाहेब कवडे, विठ्ठल आहेर, चेतन पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. विरोधक म्हणतात शंभर कोटींची बांधकामे केली. पण मी सांगते आम्ही 400 कोटींचे बांधकाम केले. संस्थेच्या 11 शाळांना सीबीएसई बोर्डाचा दर्जा दिला. 42 शाळा मंदिराबाहेर काढल्या. शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या आधारे आम्ही कामकाज केले आहे. तसेच, ३७०० सेवकांचे अनुदानित सेवेवर काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी संपूर्ण पॅनलला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

संस्थाबाह्य व्यक्ती या निवडणुकीत हस्तक्षेप करत असून माजी पालकमंत्री यांच्याकडे संस्थेची साडेबारा एकर जागा आहे. याविषयीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण त्यांना जागा जाण्याची भीती असल्यामुळे ते आमच्याविरोधात काम करत असल्याचेही त्यांनी भुजबळांचे नाव न घेता सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉ.राहुल आहेर, माणिकराव बोरस्ते, भास्कर बनकर, भारत कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले. चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी आभार मानले.

कुणाला पाडण्याएवढी मी मोठी नाही : पवार

- Advertisement -

मविप्र समाज शिक्षण संस्था हे एक ज्ञानमंदिर आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही निवडणुकीत मी कधी सहभाग घेतलेला नाही आणि राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलेले नसताना काही लोकांना वाटते मी विरोधात काम केले. पण कुणाला पाडण्याएवढी मी मोठी नाही. फक्त आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या व्यासपीठावर एकदा गेले होते. तेव्हा मी म्हटले होते, तुम्ही लढा मी आहे पाठिशी’ एवढाच काय तो राजकारणाशी संबंध आल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच, मविप्र संस्थेच्या सभासदांना वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -