घरक्राइमनिफाड तालुक्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

निफाड तालुक्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

Subscribe

पत्नीसह सात जणांना अटक; नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई

नाशिक : निफाड तालुक्यातील गणेश नगर येथील सचिन उर्फ काळू दुसाने याच्या हत्येचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सचिनच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने एक लाखाची सुपारी देऊन त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सचिन त्याच्या पत्नीच्या व बांधकाम व्यावसायिक असलेला प्रियकर दत्तात्रय महाजन यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी व प्रियकराने सचिनला संपवण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी देत त्याची हत्या केली. पोलिसांनी सचिनची पत्नी व प्रियकरासह रिक्षाचालक व इडली-डोसा विकणार्‍या अण्णाला अटक केली आहे.

सचिन श्यामराव दुसाने असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संशयित पत्नी शोभा सचिन दुसाने (30), प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन (४३ दोघेही रा. गणेशनगर, निफाड), संदीप किट्टू स्वामी (३८, इडली विक्रेता, रा. सिंहस्थ नगर, सिडको, नाशिक), मजूर अशोक मोहन काळे (३० रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे), रिक्षाचालक गोरख नामदेव जगताप (४८, रा. राणा प्रताप चौक, सिडको, नाशिक), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहीर अहेमद शहा (२६, रा. विराट नगर, अंबड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

- Advertisement -

२२ जानेवारी रोजी रात्री सचिन दुसाने याचा खून संशयितांनी गळा आवळून व रॉड डोक्यात मारुन खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेठ पोलीस ठाण्यात टाकला. २५ जानेवारी रोजी पोलिसांनी अनोळखी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासासाठी गुजरात पोलिसांची मदत घेतली. त्यासाठी गुजराती भाषेत पत्रकसुद्धा काढले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोणताही पुरावा नसताना दत्तात्रय महाजन व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने महाजनला ताब्यात घेतले.

चौकशी केली असता त्यात गुन्ह्याची कबुली दिली. महाजन व त्याची प्रेयसी शोभा यांनी २२ जानेवारी रोजी घरातच सचिनची हत्या केली. या घटनेत त्याने संदीप रखामी व गोरख जगताप, अशोक काळे, पिंटू मोगरे यांची मदत घेतली. सचिनची हत्या केल्यावर तिघांनी वापरलेल्या हत्यारांची व मोबाईलची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे व गोरख जगताप, पिंटु मोगरेला पकडण्यात आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली डस्टर कार (एमएच- ४३, एडब्ल्यू- १३०८) ही संदीप स्वामी याने अंबड आयटीआय लिंक रोडला भंगार व्यावसायिक मुकरम शहा याच्याकडे स्क्रॅपमध्ये दिली. तसेच, दत्तात्रय महाजन याची स्विफ्ट कार (एमएच-१५-डीएम-८६४३२) संदीप स्वामी व इतर तिघांनी निफाड येथे येण्याकरता वापरली. या खून प्रकरणात सहा मोबाईल फोन व स्वामी याच्या ताब्यातील सुपारीपोटी दिलेली एक लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली.

पतीने त्रास दिला की ती करायची प्रियकराकडे तक्रार

पतीने त्रास दिला पत्नी प्रियकराकडे तक्रार करायची. त्यातून १५ जानेवारी रोजी पतीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २२ जानेवारी रोजी पत्नी, प्रियकर व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने पतीचा खून केला. मुख्य आरोपी तथा प्रियकर सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. – सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -