घरमहाराष्ट्रनाशिकभाजप खासदार कंगणाचा निषेध करणार का?

भाजप खासदार कंगणाचा निषेध करणार का?

Subscribe

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलगांचा सवाल

ञ्यंबकेश्वर  : कंगणा रनोट या अभिनेत्री ने महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राचा अपमान केला, परंतु केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचे समर्थन करत वाय सुरक्षा दिली. या कृत्याचा निषेध राज्यातील जनता करतेय, पण जर महाष्ट्रातील जनतेने ज्या भाजप लोकप्रतीनिंधींना निवडून दिले, त्यांनी विरोध नोंदवावा अथवा राजीनामा द्यावा असे पत्र जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधींना खासदार भारती पवार, आमदार राहुल आहेर,
आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांना राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलगांकडुन ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
कंगना रनोट या अभिनेत्रीला केंद्र शासनाने केंद्रीय गृहमंत्र्यांनी “वाय सुरक्षा” कशी दिली? महाराष्ट्राला “पाक व्याप्त काश्मीर” म्हणणाऱ्या निर्लज्ज अभिनेत्रीला केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाय सुरक्षा दिली, त्यावेळेस महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्राचा अपमान कसा काय सहन होतो? महाराष्ट्र वरती कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन संकट परतवून लावतात. परंतु भारतीय जनता पक्षाचे हुकूमशहा अमित शहा यांना “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले” अशा महापुरुषांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का घाबरतात? महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अभिनेत्रीला संरक्षण देण्यापर्यंत मजल जाते तरीदेखील एकही भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला नेता का दिल्लीतल्या हुकुमशाही गाजवणाऱ्या नेत्यांसमोर बोलत नाही? संबंधित अभिनेत्रीच्या चारित्र्याबद्दल आम्ही आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील अशा अभिनेत्रीला संरक्षण दिले जाते आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीतील हुकूमशहासमोर खाली माना घालून सहन करतात. भारतीय जनता पक्ष त्या लोकप्रतिनिधींनी आपलं इमान हुकूमशहासमोर गहाण टाकून पद मिळवलीत का? महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला लोकहिताचे काम करण्याकरिता लोकशाही मार्गाने संविधानिक पदावरती पाठवला. आपल्याला जर महाराष्ट्राची अस्मिता जपता येत नसेल तर ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांचा हा अपमान नाही का? भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने आपले राजीनामे देऊन घटनेचा निषेध करावा. सर्वसामान्य मतदारांच्या भावना दुखण्याचे काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कडलग यांनी पञातून केली आहे.

भाजपचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही..

अभिनेञी कंगणा रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्या व्यक्तीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देऊन महाराष्ट्र विरोधी कारवाईसाठी भाजप प्रोत्साहन देते आहे का? या विरोधात भाजपचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही.
– पुरुषोत्तम मधुकर कडलग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -