घरमहाराष्ट्रनाशिकआमदारांवरही आता कारवाई होणार का?

आमदारांवरही आता कारवाई होणार का?

Subscribe

पंचवटीसह विविध भागांत फलकबाजीला उधाण

शहरात ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा आणि विनापरवानगी शुभेच्छा होर्डिंग्स लावण्यावरून चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणार्‍या पूर्व विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर महापौरांनी महासभेत थेट निलंबनाची कारवाई केली व त्यांना चक्क सभागृहाबाहेर काढले. हा प्रकार ताजा असतानाच आमदार बाळासाहेब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटीतील अनेक चौकांत विनापरवानगी होर्डिंग्स झळकत आहेत. आता महापौर या विनापरवानगी होर्डिंगबाजीवर काय कारवाई करतात, याकडे जागरूक नागरिकांचे लक्ष लागून आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांसह हितचिंतकांनी पंचवटीतील निमाणी बसस्थानक, परशुराम पुरीया चौक, पंचवटी कारंजा, जुना आडगाव नाका, काट्यामारुती चौक आदी ठिकाणी मोठ-मोठे शुभेच्छा फलक उभारण्यात आले आहेत. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची जाहिरातबाजी किंवा फलक लावण्यापूर्वी महापालिकेकडून जाहिरात कर भरून अधिकृतरित्या जाहिरात करणे बंधनकारक असताना आमदार सानप यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांनी पालिकेचे नियम पायदळी तुडवत होर्डिंग लावले आहेत. गेल्या चार -पाच दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत अनधिकृत फलकबाजीप्रकरणी महापौर रंजना भानसी यांनी थेट धारणकर नामक अधिकार्‍याला निलंबीत केले. मग आता पंचवटीत अनधिकृत आणि विनापरवानगी फलकबाजी करणार्‍यांविरोधात महापौर रंजना भानसी कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

पक्षनिष्ठेबाबत चर्चेला उधाण

आमदार सानप हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा होर्डिंगवर भाजपचे ‘कमळ’च गायब झाल्याने आमदार सानपांच्या पक्षनिष्ठेबाबत ही दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मनपाकडून होर्डिंगसाठी मान्यता दिली गेल्यास एक विशिष्ट असा लोगो असतो. त्यावर मुदतही असते. पंचवटी परिसरात लागलेल्या होर्डिंगवर असे मनपाचे कुठलाही चिन्हं दिसत नाही. त्यात किती अधिकृत आणि किती अनधिकृत हे समजणे अवघड झाले आहे. बाळासाहेब सानप यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंगसाठी पाच ते सहा अर्ज आले होते. त्यास पावती फाडून परवानगी दिली असून बरेच होर्डिंग खासगी जागेत लावले आहेत.

किती फलक अनधिकृत हे समजणे अवघड

मनपाकडून होर्डिंगसाठी मान्यता दिल्यास एक विशिष्ट लोगो असतो. त्यावर मुदतही दिलेली असते. पंचवटी परिसरात लागलेल्या होर्डिंगवर असे मनपाचे लोगो दिसत नाहीत. त्यामुळे किती फलक अनधिकृत आहेे हे समजणे अवघड आहे. – तुषार देशमुख, विविध कर विभाग, मनपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -