घरताज्या घडामोडीआरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : कृषीमंत्री दादा भुसे

आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : कृषीमंत्री दादा भुसे

Subscribe

मालेगावमधील वाढत्या करोना रूग्ण संख्येबाबत व्यक्त केली चिंता

करोना विषाणूशी लढा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे. रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सुचना देतांना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी आज दिले. मालेगावमधील करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. रमजान पर्वाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना फळे, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासू नये याकरीता विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. रमजान पर्वाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी भुसे म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रातील व त्याबाहेरील प्रत्येक नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहचल्या पाहिजे. भाजीपाला, दुध व फळे यांचे नियोजन करतांना महानगरपालिकेमार्फत सुचविण्यात आलेल्या प्रभागातील दहा ठिकाणांपर्यंत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. प्रशासनाने देखील शासकीय चौकटीत न राहता मानवतावादी दृष्टीकोनातून नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध केल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, पोलिस अधिक्षक  आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, माजी आमदार आसिफ शेख, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

कायदा हातात घेवू नका

मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे नागरिकांवर भितीचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन जिवाचे रान करुन अहोरात्र झटत आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अपेक्षित असतांना त्यांच्यावर धावून जाणे, रुग्णालयात तोडफोड करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाला बंधिस्त रहावे लागत असतांना त्याला ९७ टक्के नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही मुठभर लोकांकडून असे बेकायदेशीर प्रकार होत आहेत, ते बरोबर नाही. कुणी जाणून बुजून असे प्रकार करुन कायदा होतात घेत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनामार्फत देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -