घरमहाराष्ट्रनाशिकआठ दिवसांत वृत्तपत्र विक्रेता नोंदणीसह योजनांचे धोरण ठरवू : निलंगेकर पाटील

आठ दिवसांत वृत्तपत्र विक्रेता नोंदणीसह योजनांचे धोरण ठरवू : निलंगेकर पाटील

Subscribe

९ फेब्रुवारीस लातूर येथे मोर्चा न काढण्याचेही आवाहन, मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली.

आठ दिवसांच्या आत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सल्लागार मंडळाची स्थापना करून वृत्तपत्र विक्रेत्यांची शासन दरबारी असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करण्यासह इतर योजनांबाबत धोरण प्रारंभ करू, असे आश्वासन देत ९ फेब्रुवारीस लातूर येथे मोर्चा काढू नये, असे आवाहन कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी केले. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली.

बैठकीस ठाण्याचे आमदार संजय केळकर, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, असंघटीत कामगार आयुक्त यांच्यासह राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, जेष्ठ सल्लागार शिवगोंड खोत, उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, अण्णा जगताप, संघटन सचिव रघूनाथ कांबळे, संजय पावसे, रवींद्र कुलकर्णी, सदा नंदूर, मधू सदडेकर, जयंत डफळे उपस्थित होते. कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी पूर्ण वेळ कामास न्याय मिळावा, असे मत मांडले. सरचिटणीस बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यासाठी स्वंतत्र योजना राबवा, असे सांगितले. बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय नाही झाला, तर पुढे आक्रमक धोरण घेऊ, असा निर्णय घेतला. बैठकीला राज्य संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सल्लागार शिवगोंडा खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -