घरमहाराष्ट्रनाशिकढकांबे गोळीबार प्रकरणातील साक्षीदार फितूर

ढकांबे गोळीबार प्रकरणातील साक्षीदार फितूर

Subscribe

न्यायालयाने साक्षीदारांविरुद्ध काढले सूचनापत्र

बहुचर्चित ढकांबे गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्यांसह एक साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदार फितूर झाल्याने चार संशयितांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली असून याप्रकरणी न्यायालयाने दोन फितूर संशयितांना आपल्या विरूध्द कारवाई का करू नये, असे सुचनापत्र काढले आहे.

दशरथ पांडूरंग पाटील आणि दीपक राजेंद्र जाधव, अशी फितूरांची नावे आहेत. घटनेतील मुख्य साक्षीदार दशरथ पाटील यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. ही घटना १७ जानेवारी २०१८ ला घडली होती. सायंकाळच्या सुमारास तक्रारदार अमोल भास्कर पाटील,दिपक राजेंद्र जाधव, दशरथ पांडूरंग पाटील व राजा सुर्यवंशी हे चार मित्र दोन मोटारसायकलीवर ओझरखेड धरणावर जेवणासाठी जात असतांना सदर घटना घडली होती. रात्री पावणे आठच्या सुमारास ढकांबे टोल नाका भागात दिंडोरीकडून कारमधून आलेल्या रमेश चांगले,सुनील चांगले,शेखर पवार आणि विजय कांदळकर आदींनी दुचाकी अडवत गोळीबार केला. तक्रारदार अमोल पाटील याच्या भावाशी झालेल्या मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी गोळीबार केल्याचा आरोप होता. दशरथ पाटील याच्या कमरेस गोळी चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी गुह्याचा तपास करून आरोपी अटक करीत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते.

- Advertisement -

जिल्हा व सत्र न्यायाधिश एन.जी गिमेकर यांच्या कोर्टात हा खटला चालला. या खटल्यात विशेष सरकारी वकील रवींद्र निकम यांनी साक्षीदार तपासले असता न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. दरम्यान, या खटल्यात जखमी दशरथ पाटील आणि दीपक जाधव यांनी साक्ष फिरविल्याने संशयिताच्या सुटकेस मदत झाली. या घटनेची गंभीर दखल घेत दोघा फितूरांवर कारवाई का करू नये, असे सुचनापत्र काढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -