Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक वोक्हार्ट हॉस्पिटलने केली जितेंद्र भावेंविरुद्ध तक्रार

वोक्हार्ट हॉस्पिटलने केली जितेंद्र भावेंविरुद्ध तक्रार

अर्धनग्न आंदोलनप्रकरण : भावेंवर तीन गुन्हे दाखल

Related Story

- Advertisement -

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करुन प्रसिद्धी झोतात आलेले आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावेंविरुद्ध तब्बल १० दिवसांनंतर हॉस्पिटलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नमन गंगाप्रसाद यादव यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जितेंद्र भावे व अमोल जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास १० दिवस का लागले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आंदोलन केल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी आंदोलनकर्ते जितेंद्र भावे व अमोल जाधव यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते. या आंदोलनाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरही उमटले होते. जितेंद्र भावे नव्हे, आरोग्य व्यवस्थाच झाली नागडी, अशा शब्दांत सोशल यूजर्सने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच, पोलीस ठाण्याच्या आवारात भावेंच्या समर्थकांनी गर्दी केली होती. शांतता भंग, घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ भावेंसह समर्थकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विजन हॉस्पिटलचे डॉ. विक्रांत विजय यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार जितेंद्र भावेंसह रुग्णाचे नातेवाईक व समर्थकांविरुद्ध दाखल केली. आता गुरुवारी (दि.३) रात्री १० वाजेदरम्यान वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने नमन यादव यांनी जितेंद्र भावे व अमोल जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. दोघांनी संगनमत करुन वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करुन स्वत:चे अंगावरील कपडे काढले. त्यानंतर हॉस्पिटलमधील महिला कर्मचार्‍यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. जर पैसे परत केले नाहीतर अंडरपॅन्टसुद्धा काढू, असे धमकावून हॉस्पिटल प्रशासन व कर्तव्यावरील डॉक्टरांना शिवीगाळ केली, असे यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे करत आहेत.

- Advertisement -