घरक्राइमपाय घसरुन विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

पाय घसरुन विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

Subscribe

पाय घसरुन विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजेदरम्यान शिंदेमळा, औरंगाबाद रोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मंगला गंगाधर शिंदे (वय ५६, रा. शिंदेमळा, औरंगाबाद रोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगला शिंदे शिंदेमळ्यात शेतकाम करण्यासाठी आल्या होत्या. शेतातील विहीराला कठडे नसून, विहीर जमिनीस समांतर आहे. दिवसभर पाऊस सुरु असल्याने शेतजमीन ओली झाली होती. त्यामुळे मातीवर पाय घसरुन त्या थेट विहिरीतील पाण्यात पडल्या. पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार थेटे करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -