महिलेने केले अल्पवयीन युवकाचे अपहरण

नाशिकरोड : अल्पवयीन युवकाला फुस लावून अपहरण करत दिल्लीला पळवून नेणा-या महिले विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विंचूर ता.निफाड येथील मंजिरी कांकरिया उर्फ मंजरी पांडे उर्फ आयरा शेख (२७) व रेहान असलम शेख (१७) रा. दोघेही विंचूर, ता. निफाड हे ओळखीचे असून रेहान हा शिक्षण घेत आहे, गेल्या काही दिवसांपासून रेहानचे वागणे संशयास्पद वाटल्याने कुटुंबीयांनी त्याला उपनगर येथील त्याचे नातेवाईकांकडे नेत असतांना काकांच्या दुचाकीवरुन उतरुन पळून गेला, त्याचा शोध घेत असतांना दोन दिवसांनी नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क करत मंजिरी उर्फ आयरा शेख हिने रेहान दिल्ली येथे असल्याची माहिती दिली, गाडीवरून पळून गेल्यावर रेहानला आयरा शेख हिने फूस लावून पळवून नेल्याचे यातून समोर आल्याने, कुटूंबियांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या विरोधात अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरिक्षक छाया वाघ तपास करत आहे.