घरमहाराष्ट्रनाशिकपोटच्या गोळ्याला गळफास देत महिलेची आत्महत्या

पोटच्या गोळ्याला गळफास देत महिलेची आत्महत्या

Subscribe

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला गळफास देत स्वत:ही फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना नांदगाव तालुक्यातील गणेशनगर-ठाकरवाडी येथे घडली. याप्रकरणी मृत विवाहितेचा पती गोरख मेंगाळ याने नांदगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. मृत महिलेच्या आई-वडिलांनी आपली तक्रार नसल्याचे सांगितले असल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले तपास करीत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पती गोरख १२ नोव्हेंबरला खडीक्रेशरच्या कामावर गेला होता. दीर शरद मेंगाळ आणि त्याची पत्नी शेतात कामाला गेले होत. सायंकाळी शेतातून परत आलेल्या शरद याला घराचा बंद दरवाजा वाजूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेतावर जाऊन कौले उचकावून आत बघितले असता, पुतण्या संदीप आणि राहिबाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या शरद याने तातडीने गोरखला फोन करुन बोलावून घेतले. पोलीसपाटील सदाशिव मेंगाळ यांनी पोलिसांना कळविले. चार वर्षांपूर्वी कुसूमतेल येथील राहिबाईचा विवाह माणिकपूंज येथील गणेशनगर वस्तीत राहणार्‍या गोरख मेंगाळ यांच्याशी झाला होता. गोरख आणि राहिबाई यांना संदीप हा मुलगा झाला. घराच्या वाशाला नायलॉनदोर अडकवून पलंगाच्या कडेला उभे राहून तीने उडी गेल्याने गळफास आवळला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -