घरताज्या घडामोडीचिमुकल्याच्या हत्येनंतर मातेची आत्महत्या

चिमुकल्याच्या हत्येनंतर मातेची आत्महत्या

Subscribe

पाथर्डी फाटा परिसरातील धक्कादायक घटना

पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय (32 रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) सोमवार (दि9) यांनी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर ,पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -