घरमहाराष्ट्रनाशिकपोलिसाने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

पोलिसाने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

Subscribe

संबंधित पोलीस आर्थिक शोषण करत देत आहे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी

पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेकडेच पोलीस हवालदाराने शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना समोर आले आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने संबंधित पोलिसाविरुद्ध पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित पोलीस आर्थिक शोषण करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. त्याला तत्काळ पोलीस दलातून निलंबन करावे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिला विधवा आहे. तिच्यात आणि दिरामध्ये जमिनीचे वाद सुरु आहेत. त्यातून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, संबंधित पोलीस हवालदाराने महिलेशी ओळख वाढवली. ती एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन पोलिसाने सुरु केले. संबंधित पोलीस सातत्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत आहे. त्यातून पोलिसाने महिलेचे बदनामी सुरु केली असून, खोटे गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित पोलिसाने महिलेसह तिच्या मुलांचे त्रास देणे सुरु केले आहे. तो महिलेस आत्महत्या करण्यास भाग पाडू शकतो. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसाची छेड काढली होती. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकार्‍याची तत्काळ अहमदनगर पोलीस मुख्यालयात बदली झाली. त्यामुळे अकोले व राजूर पोलिसांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -