भद्रकाली पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी प्रणीता पवार आणि पोलिस नाईक बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजारची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पवार आणि बैरागी यांना भद्रकाली पोलिस चौकी याठिकाणी पैसे घेतांना अटक करण्यात आली आहे.

कालच आडगांव पोलिस ठाण्यात २० हजारची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याल अटक करण्यात आली होती. सलग दोन दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून झालेल्या कारवाई मुले पोलिस् प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसात संवेदनशील असलेल्या, गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेला त्याच सोबत अनेक सण-उत्सव ज्या भागत साजरा होतो अश्या भद्रकाली पोलिस चौकीत प्रणीत पवार यांनी  चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात होते.