घरमहाराष्ट्रनाशिकएप्रिलमध्येच पाण्यासाठी महिलांचे अग्निदिव्य

एप्रिलमध्येच पाण्यासाठी महिलांचे अग्निदिव्य

Subscribe

तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात धरणे असूनही उपाशी राहण्याची वेळ काही गावांवर आली आहे.

एप्रिलमध्येच महिलांना मोठ्या अग्निदिव्यातून पाणी मिळत आहे. पूर्व भागातील अक्राळे, खतवड, पालखेड, आंबे दिंडोरी, खडक सुकेना, कोराटे गावासाठी जीवन प्राधिकरणाने योजना राबवली होती. परंतु, अजूनही योजना पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे या भागात ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या अक्राळे येथे आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीला उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते. यामुळे ते पाणी भरण्यासाठी महिलांना मध्यरात्री उठून पाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळेने स्व:खर्चाने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

गावाजवळच सध्या औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी पालखेड धरणावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करणार आहे. या योजनेत अक्राळेचा समावेश करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मोहाडीतल्या गणेशगाव येथे देखील तीव्र पाणीटंचाई आहे. गणेशगाव उंचावर असल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. या विहिरीत उन्हाळ्यात अत्यल्प पाणी येत असल्यामुळे पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. मोहाडी ग्रामपंचायतीद्वारे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जानोरी, मोहाडी, साकोरे, ओझर मिगसाठी १९९८ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना सुरू झाली होती. योजना पालखेड धरण ते या गावास थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करते. परंतु या योजनेद्वारे पाणीपुरवठा होणार्‍या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पाणी कमी पडत आहे. या परिसरात औद्योगिकरण देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे भविष्यात ही योजना पाणीपुरवठा करण्यास अडचणीचे ठरू शकते.

टँकरने पाणीपुरवठा प्रस्तावित

चिकाडी, तळेगाव दिंडोरी, तळेगाव वणी, मानोरी, गवळवाडी, चिंचखेड आदींसह इतर गावे असून आतापर्यंत पाणी टंचाई असलेले प्रस्ताव कोणत्याही गावाकडून आलेले नसून काही दिवसात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अधिग्रहण प्रस्तावित गाव

राशेगाव, वलखेड, लोखंडेवाडी, पिंप्री आंचला, महाजे, साद्राळे, कोल्हेर, भनवड, खतवड, हातनोरे, चिकाडी, चिंचखेड, पिंपळगाव केतकी, परमोरी, ढकांबे, निगडोळ, मावडी, तळेगाव दिंडोरी, माळेगाव काझी, तलेगाववणी, करंजाळी, वाडी-वाघदेव पाडा, कोल्हेर पाडा, खुंटीचा पाडा (वनारे), टाक्याच्या पाडा, अस्वली पाडा, पावरणी पाडा, औताळे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -