घरमहाराष्ट्रनाशिकमहिला चोरट्यांना पकडले रंगेहात

महिला चोरट्यांना पकडले रंगेहात

Subscribe

एसटीने प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधील ४४ हजारांची रोकड लंपास

बसस्थानकातून एसटीने प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधील ४४ हजारांची रोकड लंपास करणार्‍या महिला चोरट्यांना रंगहात पकडले असून त्यांच्याकडून रोकड जप्त करत महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवार (दि.१९) जुलै रोजी मीना शिरसाठ व कमल पानपाटील या कळवण नाशिक (एम एच २० -बी एल ४१८६) बसने नाशिकला जात होत्या.बसमध्ये गर्दी असल्याने बसायला जागा नव्हती म्हणून दुसर्‍या बसने जाण्यासाठी उतरत होत्या. त्यावेळे त्यांच्या पर्समधील ४४ हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. बसला गर्दी होती त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.ड्युटीवर असेलेल्या पोलिसांना सपोनि स्वप्निल राजपूत यांना माहिती कळविली. त्यांनी सूचना दिल्यानुसार बसस्थानकात गेले व गाडीची माहिती घेतली व पो.उप.नि. प्रविण उदे, पो.कर्मचारी अण्णा जाधव, प्रदिप शिंदे, किरण धुळे, महिला पोलीस कर्मचारी मंदा बर्डे, पिडीत महिला मीना शिरसाठ, नाना जाधव यांच्या गाडीने तातडीने बसकडे रवाना झाले. तसेच वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपुत हे आरोपी घेऊन कोर्टात जात होते. त्यांना ही घटना कळताच त्यांनी त्या बसचा पाठलाग करत लखमापूर फाट्याच्या पुढे बसला गाडी आडवी लावुन थांबविली. बसमध्ये चढून चौकशी केली असता संशयित दोन महिला दिसल्या. मीना शिरसाठ यांनी त्या महिलांना ओळखले. त्यांना बाजुला घेतले असता त्या महिलांनी आकांडतांडव करु लागल्या. त्याकडे असलेल्या लहान मुलांना चिमटे घेऊन आराडा ओरड होईल असे कृत्य करु लागल्या. त्यांचेकडे झाडाझडती केली असता त्यांच्याकडे चोरलेले पंचेचाळीस हजाराची रोकड सापडली त्यांना पोलीसांनी ताब्यात घेताच एकीने डोक्यावर धारदार वस्तुने जखम करून घेतली महिला पोलीसांनी संशयित महिलांना पोलीस ठाण्यात आणत गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -