घरमहाराष्ट्रनाशिकगावठाण विकास योजनेत वाड्यांच्या सुरक्षीततेची उपाययोजना

गावठाण विकास योजनेत वाड्यांच्या सुरक्षीततेची उपाययोजना

Subscribe

स्मार्ट सिटी आढावा बैठकीत आयुक्तांची सूचना

गावठाण विकास अर्थात क्लस्टर डेव्हलपेंमटची योजना स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानेच पूर्ण होऊ शकते. त्यादृष्टीने गावठाणातील स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करुन त्यादृष्टीनेच योजना राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेत. गावठाणातील जीर्ण वाड्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयुक्त गमे यांनी स्मार्ट कामांविषयी विविध सूचना दिल्या. स्मार्ट प्रकल्पांमुळे नाशिकच्या नावलौकिकात भर पडणार असल्याचे नमूद करताना या कामांची गुणवत्ता राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी नागरिकांना स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत सूचना केल्या. वरिष्ठ माहिती तंत्रज्ञान महाव्यवस्थापक प्रमोद गुर्जर यांनी इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटरचे महत्त्व विशद केले. मुख्य वित्त अधिकारी बाबूराव निर्मल यांनी जीएसटी आणि कररचनेचे महत्त्व समजावून सांगितले. जनरल मॅनेजर (सिव्हिल) विश्राम पाटील, कंपनी सचिव महेंद्र शिंदे, मुख्य नगररचनाकार कांचन बोधले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस उपमहाव्यवस्थापक (वित्त) तथा प्रशासन अधिकारी विनोद पाटील, तसेच स्मार्ट कंपनीतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. जनसंपर्क अधिकारी प्रशांत चिडे यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश बर्डे यांनी आभार मानले.

- Advertisement -

प्रोजेक्ट गोदा उणीव मुक्त करा

नाशिक शहरासाठीच नव्हे, तर जगभरातून येणार्‍या पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने ’प्रोजेक्ट गोदा’ हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असल्याने या कामात कोणत्याही प्रकारची उणीव राहता कामा नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पूररेषेचा विचार करूनच ’प्रोजेक्ट गोदा’चा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे पीएमसीच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीतील गाळ काढणे, गोदावरी नदीचे सौंदर्यीकरण करणे, त्याचबरोबर गॅबियन वॉलची रचना करणे, धोबीघाट आणि पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो तेथील काँक्रिटीकरण काढणे, तसेच ऑटोमेटेड न्यूमॅटिक गेट बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत. त्याद्वारे पूर परिस्थितीतही नदीच्या पात्रातून पाणी बाहेर येण्याचा धोका कमी होणार आहे. गोदावरी नदीतील पानवेली आणि निर्माल्य काढण्यासाठी थ्रॅश स्कीमरचा वापर करण्यात येणार आहे. प्रोजेक्ट गोदामध्ये ओपन थिएटर, लहान मुलांसाठी उद्यान, वृद्धांसाठी वॉक वे, हेरीटेज वॉक, ओपन रेस्टॉरंट आदी गोष्टींचा समावेश असणार आहे..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -