तलाठी संघटनेचे कामबंद आंदोलन

ई-भूमी अभिलेख रामदास जगताप यांनी अपशब्द वापरून अर्वाच्च भाषेत अपमान केला

rajasthan political crisis maharashtra congress protest in front of raj bhawan
गेहलोत सरकारसाठी काँग्रेसचं आंदोलन

नाशिक : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना ई-भूमी अभिलेख रामदास जगताप यांनी अपशब्द वापरून अर्वाच्च भाषेत अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ आजपासून नाशिक तालुका व जिल्हा तलाठी संघाने काम बंद आंदोलन पुकारत तहसिल कार्यालयावर निदर्शने सुरु केली आहे. जगताप यांची समन्वयक पदावरुन बदली करावी अन्यथा बेमुदत हे आंदोलन सुरु राहिल असा इशाराच तलाठी संघटनांनी दिला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना व्हॉट्सअपवरून रामदास जगताप ई-भुमी अभिलेख प्रकल्प राज्य समन्वयक यांनी अपशब्द व अर्वाच्च भाषेचा शब्दप्रयोग करून अपमान केला. अशी असंविधानिक भाषा वापरणाजया अधिकाजयावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी. यासाठी नाशिक तालुका व जिल्हा तलाठी संघाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाजयांनी रामदास जगताप यांच्यावर कारवाई न केल्यास १३ ऑक्टोंबरपासून तलाठी संघाच्यावतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. यात निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे काम वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नाशिक तलाठी संघाचे अध्यक्ष महेश आहिरे यांनी दिला आहे. या प्रसंगी तालुका संघाचे सरचिटणीस रविंद्र पवार,कार्याध्यक्ष बाबुराव रिकामे, नाशिक मंडळ सदस्य अरुण पाटील, संजय साळी,प्रिती अग्रवाल,बबन कोकाटे,पंढरीनाथ मोंढे,बाळासाहेब काळे,विजय महाले, सोनाली शिंदे,सुधीर उगले आदी उपस्थित होते.

तलाठी संघाच्या अन्य मागण्या
तलाठी व मंडळ अधिकाजयांचे वेतन वेळेवर मिळत नसून ते महिन्याच्या ५ तारखेपर्यंत नियमित करावे, वेतनातून कमी केलेला भत्ता पूर्ववत करावा, कार्यालयीन खर्चाच्या निधीतून टेबल-खुर्ची व इतर फर्निचर देण्यात यावे, अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाजयांना शासनाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन देखील यावेळी सादर करण्यात आले. या समस्यांचे वेळेत निराकरण न झाल्यास तलाठी संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.