घरमहाराष्ट्रनाशिककपिला संगमावर पूजन; गोदावरीसह उपनदयांच्या संवर्धनसाठी प्रार्थना

कपिला संगमावर पूजन; गोदावरीसह उपनदयांच्या संवर्धनसाठी प्रार्थना

Subscribe

नाशिक : गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणीमात्रास आरोग्य व समृध्दी लाभो याकरीता कपिला नदी संवर्धन समितीच्यावतीने कपिला गोदावरी पूजन करण्यात आले. तपोवनातील गोदा कपिला संगमावर साधू महंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह उपनद्या दुथडी वरून वाहत आहेत. धरणांमध्येही मुबलक प्रमाणात जलसाठा निर्माण होत आहे. पावसामुळे बळीराजाही सुखावला असून पेरण्यांना वेग आला आहे. नदी नाल्यांना पुर आल्याने गोदावरीही खळखळून वाहत आहे. गोदावरी कपिला अशीच खळाळून वाहत राहो याकरीता दरवर्षी पावसाळयात कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने कपिला गोदावरी पूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन करून गोदावरी कपिला संगमावर आरती करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष योगेश बर्वे(दीनानाथ महाराज) महंत भक्तीचरण दासजी महाराज, पर्यावरण प्रेमी निशिकांत पगारे, यांच्या हस्ते जलपूजन,आरती करण्यात आली. नदीला कोणतीही जात धर्म नसते, नदी जीवन आहे ती प्रवाहित व प्रदूषणमुक्त राहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गोदावरी नदी आपली जीवनादायनी असल्याने प्रत्येक नाशिककर नागरिकाने नदीच्या संरक्षणासाठी प्रदूषण करणार्‍यांना रोखले पाहीजे तसेच स्वतः देखील जलप्रदुषण करणार नाही अश शपथ घेतली पाहिजे असे मत यावेळी उपस्थित साधू महंतांनी व्यक्त केले. महंत बैजनाथ महाराज यांच्या हस्ते स्वदेशी प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी महंत राजाराम दास महाराज, हरीचरण महाराज,कपिलानदी समितीचे सचिव दीपक बैरागी,उदय थोरात,प्रा सोमनाथ मुठाळ,सुनील परदेशी,गणेश कुलथे ,डॉ.अजय कापडणीस आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -