घरमहाराष्ट्रनाशिकतापदायक प्रवास : सटाणा-ताहाराबाद रस्त्याची चाळण

तापदायक प्रवास : सटाणा-ताहाराबाद रस्त्याची चाळण

Subscribe

संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

सटाणा-ताहाराबाद-कातरवेल या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरस्तीचे काम सुरू आहे. मात्र २०२० पासून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघात होऊन अनेक निरपराधांना प्राणाला मुकावे लागत आहे. रुग्णवाहिकेला देखील रुग्णालयापर्यंत रुग्णाला वेळेवर पोहोचवता येत नसल्याने तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांनी रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विकास रस्ते महामंडळा अंतर्गत सटाणा ताहाराबाद कातरवेल रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. दोन राज्यांना जोडणारा हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. अवजड वाहने व शेतीपिकांच्या वाहतुकीसह परराज्यात जाणारी वाहने देखील याच रस्त्यावरून धावत असतात. गेल्या दोन वर्षांपासून सटाणा- ताहाराबाद रस्त्यावर कातरवेलजवळ रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे पडली आहेत. यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. तसेच खड्डे टाळण्याच्या नादात अनेक अपघातही या रस्त्यावर नेहमी घडतात.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून कोविड संसर्गाचे रुग्ण नाशिककडे रुग्णवाहीकेतून घेऊन जावे लागतात. रस्त्यावरील खड्यांच्या साम्राज्यामुळे काही रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वीच जिव गमवावा लागला आहे. अधीक्षक अभियंत्यांनी रस्त्याचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून तातडीने करून घ्यावे, तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भराव टाकावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -