घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठ परीक्षाकेंद्रांवर अ‍ॅपद्वारे लक्ष

मुक्त विद्यापीठ परीक्षाकेंद्रांवर अ‍ॅपद्वारे लक्ष

Subscribe

मॉनिटरिंग रूममधून मुक्त विद्यापीठाचे राज्यभर लक्ष

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राज्यभरात घेण्यात येणार्‍या परीक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी परीक्षाकेंद्रांना जोडणारे ‘अटेन्डन्स अ‍ॅप’ विकसित केले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवर हे अ‍ॅप सर्व परीक्षा केंद्रांवर नियुक्त पर्यवेक्षकांसाठी अनिवार्य आहे. याद्वारे पर्यवेक्षक, भरारी पथके आणि परीक्षाकेंद्रांवर विद्यापीठातील परीक्षा विभागातील मॉनिटरिंग रूममधून ऑनलाईन लक्ष ठेवले जाणार आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पद्धतीमुळे राज्यभरातील विद्यापीठांत प्रथमच, अशी प्रणाली अवलंबली जात आहे. मंगळवारी (ता. १४) मुक्त विद्यापीठाच्या दीडशे अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. राज्यभरातील ७२९ परीक्षा केंद्रांवर एकूण सहा लाख ८७ हजार ४०४ विद्यार्थी परीक्षांना सामोरे जात आहेत. सर्व परीक्षा केंद्र ऑनलाईन जोडली असून, नाशिकमधील मध्यवर्ती कार्यालयातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्या-त्या ठिकाणी नेमलेल्या पर्यवेक्षकांना अ‍ॅप दिले असून परीक्षा केंद्रावर येताच त्यांनी अ‍ॅपवरून सेल्फी घेतला की त्या पर्यवेक्षकाचा फोटोआयडी, तसेच लोकेशन विद्यापीठाच्या सिस्टिमवर उपलब्ध होईल. इन व आऊट असे दोन्ही पर्याय त्यात असून, पर्यवेक्षकांना पेपर झाल्यानंतर परीक्षाकेंद्र सोडतानाही अ‍ॅपवर आउटचा पर्याय क्लिक करणे अनिवार्य असेल. मंगळवारी पहिल्याच दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांची नोंद सिस्टिममध्ये झाली आहे. अ‍ॅप्सद्वारे पर्यवेक्षकांची मानधनाची देयके मिळणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्षाहून मोठ्या स्क्रीनवर राज्यभरातील परीक्षा केंद्रांचे लोकेशन पाहता येत आहे. पर्यवेक्षकांचा फोटो ओळखीसह सर्व प्रकारच्या काटेकोर नोंदी सिस्टिमद्वारे ठेवता येणे शक्य झाले आहे. विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार्‍या भरारी पथकालाही अ‍ॅपचा वापर अनिवार्य असेल.

- Advertisement -

पारदर्शकता येणार

पेपर तपासण्यासाठी यापूर्वी सेंट्रल अ‍ॅसेसमेंट प्रोग्राम (सीएपी) प्रणाली तयार केली होती. त्यानंतर अ‍ॅटेन्डन्स अ‍ॅपचा वापर कुलसचिव तथा विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. भोंडे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. याद्वारे परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येईल, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -