घरताज्या घडामोडीमुक्त विद्यापीठाची उन्हाळी सुटी ‘लॉकडाऊन’

मुक्त विद्यापीठाची उन्हाळी सुटी ‘लॉकडाऊन’

Subscribe

राज्यातील ‘एनएसएस’चे दोन लाख विद्यार्थी समाजकार्यात सक्रिय

नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ‘लॉकडाऊन’चा कालावधी हा उन्हाळी सुटी म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तत्पूर्वी विद्यापीठात रोजंदारी स्वरुपात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 31 मार्च रोजी वेतन मिळाले असून, नियमित कर्मचार्‍यांचे वेतन हे राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे दिले जाणार आहे. तसेच मे महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत. त्या विषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तोपर्यंत परिस्थिती बघुनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ई वायुनंदन यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -