घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात रंगणार ‘योगाथॉन-२०१९’

नाशकात रंगणार ‘योगाथॉन-२०१९’

Subscribe

एसडीएमपी संस्थेच्या वतीने १० फेब्रुवारीला १०८ सूर्यनमस्कारांची मेगा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतानाच नाशिककरांपर्यंत सूर्यनमस्कारांचे महत्त्वदेखील पोहोचावे, या व्यापक हेतूने शहरातील श्री डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या वतीने १० फेब्रुवारीला १०८ सूर्यनमस्कारांची मेगा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी शहरातील विविध भागांत सराव शिबिरांना सुरूवात झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली. गंगापूररोडवरील सुयोजित विरिडियन व्हॅलीमध्ये पहाटे साडेसहा ते साडेनऊ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. त्यात मुलींसह महिलांना सहभाग घेता येईल. मिसेस ग्लोबल युनायटेड नमिता कोहोक या उपक्रमाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाशिकमधील या व्यापक आणि अनोख्या उपक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, आयोजिका डॉ. प्रणिता गुजराथी आणि डॉ. स्वाती पगार यांनी केले आहे. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आयुष विभाग, निमा नाशिक शाखा, डॉ संदीप चिंचोलीकर, डॉ. मनिष हिरे, डॉ. व्यंकटेश पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

सूर्यनमस्कारातून साधा आरोग्य

रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो. यानिमित्ताने सूर्याची उपासना करुन आरोग्यदायी होण्याची संधी नाशिककर मुली आणि महिलांना मिळणार आहे. सूर्यनमस्कारातून सर्वांगीण व्यायाम घडतो. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धीचाही विकास होतो. तसेच, मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कमरेचे स्नायू, मेरुदंड, सर्व सांध्यांचा व्यायाम होऊन अनेक आजारांचे उच्चाटन होते.

- Advertisement -

प्रशिक्षण व सराव शिबिरांसाठी साधा संपर्क

योगाथॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये आयोजित शिबिरांच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने सूर्यनमस्कारांचे धडे गिरवून घेतले जाणार आहेत. जेणेकरून स्पर्धक शारीरिकदृष्ट्या पूर्ण तयार होतील आणि योगाथॉनमधील त्यांची प्रात्यक्षिके इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतील. या सराव शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी इटर्नल योग अकॅडमी (७९७२५७८९११) यांच्याशी संपर्क साधता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -