घरमहाराष्ट्रनाशिकसंगमनेरमधील तरुण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

संगमनेरमधील तरुण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Subscribe

नाशिकच्या आरोग्य विभागाचा कारभार संभ्रमात टाकणारा

संगमनेर तालुक्यातील कोरोना संशयित एका व्यक्तीचा स्त्राव दोन ठिकाणच्या प्रयोगशाळेत तपासल्यानंतर दोन्ही अहवाल वेगळे आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रयोगशाळेने निगेटिव्ह तर दुसऱ्या प्रयोगशाळेने त्याला आठवडाभराने पॉझिटिव्ह ठरविल्याने या रुग्णाच्या अहवालाच्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या अहवालाच्या आधारे नाशिकच्या आरोग्य विभागाने या रुग्णाला आता पॉझिटिव्ह जाहिर केल्याने आरोग्य विभागाचा कारभार भोंगळ कारभार समोर आला आहे.

बुधवारी आरोग्य विभागाच्यावतीने संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एका तीस वर्षीय तरुण प्रकृती अस्वास्थामुळे नाशिकच्या रुग्णालयात गेल्या मंगळवारी (१९ मे) दाखल झाला होता. त्याला कोरोनासदृष्य लक्षणे आढळल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने त्याचे गुरुवारी (२१ मे) स्त्राव घेत नाशिकची प्रयोगशाळा बंद असल्याने ते धुळ्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मात्र या प्रयोगशाळेतून वेळेत अहवालन आल्याने या संशयित रुग्णाचा रविवारी (२४ मे) पुन्हा स्त्राव घेऊन तो पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला. पुण्याच्या प्रयोगशाळेकडून दुसऱ्याच दिवशी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे नाशिकच्या रुग्णालयाने त्याला डिस्चार्ज दिला होता. मात्र या रुग्णावर नाशिकच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

- Advertisement -

दरम्यान धुळ्याच्या लॅबमध्ये प्रलंबित असलेला कोरोना रिपोर्ट तब्बल आठवडाभराने नाशिकच्या आरोग्य विभागाला बुधवारी दुपारी मिळाला, यात संबधित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली. याची माहिती तातडीने संगमनेरच्या यंत्रणेला देण्यात आली. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या रुग्णाला पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बुधवारी पुन्हा त्याचे स्त्राव घेण्यात आले असून ते पुन्हा एकदा तपासले जाणार आहे. त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. तोपर्यत तरी हा रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा संभ्रम कायम राहणार आहे. दरम्यान संगमनेरच्या महसूल व आरोग्य प्रशासनाने संबधित रुग्णाच्या कुटूंबियांना होम क्वारंटाईन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -